महाराष्ट्रराजकीय

“नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पुढे भाजप मध्ये येण्याचा प्रस्ताव मांडला होता. या वक्तव्यावरून आता अनेक नेते मंडळीं कडून प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे

नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा सुरु आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना भाजप मध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता. यावरून आता सेने मधून प्रतिक्रिया येत आहेत. “नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघु उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे”

एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचे शिंदे यांच्याबाबत हवामान खात्याप्रमाणे अंदाज चुकीचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे