पाचोरा शहरात युवासेना सदस्य नोंदणी अभियानास सुरवात
पाचोरा लाईव्ह-सिटी रिपोर्टर
पाचोरा (प्रतिनिधी) युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने ,सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने मुंबई सह राज्यात सुरू असलेल्या युवासेना सद्स्य नोंदणी अभियानाचा भाग म्हणून पाचोरा शहरात नोंदणी अभियान राबवण्यात आले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय व महाराणा प्रताप चौक याठिकाणी सदर नोंदणी करण्यात आली. या नोंदणीला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला 500 हुन अधिक युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली.
पुढील टप्यात आता ग्रामीण भागात सदर नोंदणी उपक्रम राबवण्यात येईल यावेळी शिवसेना शहराध्यक्ष किशोर बारवकर, सुमित पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, शरदभाऊ पाटे, सौरभ चेडे , संदीपराजे पाटील , जितेंद्र पाटील , सागर पाटील ,राहुल पाटील , योगेश पाथरवट, आबा कुमावत , सुनील गौड, मोहित राजपूत, शाहरुख खान, जय बारवकर, बापूभाऊ हटकर, भूषण पाटील, शुभम इंशी, विजय भोई सहित शहरातील युवासैनिक उपस्थित होते.



