आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पाचोऱ्यात कुजलेला मृतदेह आढळला; धक्कादायक घटनेने शहरात खळबळ…

आज गणपती विसर्जनाची लगबघ असतानां आज पाचोऱ्यात धक्कादायक आणि अत्यंत खळबळजनक घटना समोर आली समर्थ पेट्रोलपंपा जवळील रोडलगतच्या गावतात कुजलेला मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असून या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे.

पाचोरा शहरातील समर्थ पेट्रोलपंपा जवळील रोडलगतच्या परिसरात असलेल्या जंगलातून दुर्गंधी येऊ लागली होती. येथून ये-जा करणाऱ्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. दुर्गंधीमुळे येथून ये-जा करणेही मुश्किल झाले होते. तेव्हा काही स्थानिकांनी शोध घेतला असता कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. याबाबत स्थानिकांनी पाचोरा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात याबाबत अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे