आपल खान्देश

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चौथा वर्धापन दिन सोहळा भडगाव येथे संपन्न

भडगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चौथा वर्धापन दिन सोहळा संपन्न 

भडगाव (प्रतिनिधी) आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी संस्कृती फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बाळद रोड शिव कॉलनी येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव वर्धापन दिनानिमित्त कवी केशवसुत पुरस्कार वितरण सोहळा भडगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव शाखेचा चौथा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवर कवींना केशवसुत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

ग्रामीण साहित्यिक कवी वाडे तालुका भडगाव येथील अहिराणी कवी नामदेव महाजन यांना कवी केशवसुत पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी अमळनेर येथील कवी रमेश पवार यांनी आपली बाप ही कविता रसिक मान्यवरांसाठी सादर केले

मान्यवर कवींना कवी केशवसुत पुरस्कार देऊन केले सन्मानित) भडगाव येथे आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी संस्कृती फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बाळद रोड शिव कॉलनी येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव वर्धापन दिनानिमित्त कवी केशवसुत पुरस्कार वितरण सोहळा भडगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव शाखेचा चौथा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवर कवींना केशवसुत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य श्री सुनील पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समर्पण हॉस्पिटल भडगावचे संचालक डॉ. निलेश पाटील होते मान्यवर पुरस्कारार्थी मध्ये प्राध्यापक डॉक्टर रमेश माने मराठी विभाग प्रमुख प्रताप कॉलेज अमळनेर यांना सन २०१९/२० साठीचा कवी केशवसुत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सन २०२०/२१ साठी ग्रामीण साहित्यिक कवी वाडे तालुका भडगाव येथील अहिराणी कवी नामदेव महाजन यांना कवी केशवसुत पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी अमळनेर येथील कवी रमेश पवार यांनी आपली बाप ही कविता रसिक मान्यवरांसाठी सादर केले. प्रमुख उपस्थिती मध्ये भडगावचे तालुका प्रतिनिधी पत्रकार अशोक बापू परदेशी हे होते. वर्धापन दिन सोहळा यशस्वितेसाठी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कोळी कवी वाल्मीक अहिरे कवी संजय सोनार नगरदेवळेकर डॉ. प्रमोद पाटील डॉ. बी एस भालेराव पत्रकार बी एन पाटील यांनी परिश्रम घेतले वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकारी विश्वस्त कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील व जिल्हा दूध संघाच्या संचालिका व किसान शिक्षण संस्थेच्या सचिव डॉक्टर पूनम ताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक कवी रमेश धनगर यांनी केले आभार प्राध्यापक सुरेश कोळी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे