ब्रेकिंगमहाराष्ट्र

नरेंद्र मोदीं यांचं पुण्यातले मंदिर रातोरात गायब झालं ?

भाजप कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर पुण्यातील औंध भागात उभारले होते. 15 ऑगस्ट रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा करण्यात आला होता.अखेर पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने बुधवारी रात्री हे मंदिरातील पुतळा हटविण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील औंध भागात मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरून भाजपवर जोरावर टीकेची झोड उठली होती दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित कार्यकर्त्याला कानपिचक्या मिळाल्यानंतर हे मंदिरातील मोदींचा पुतळा तातडीने हटविण्यात आला आहे.

या मंदिरातील पंतप्रधान मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या जागेत हे मंदिर उभारले होते. या मंदिरात बसवण्यासाठी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता. त्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला होता . 15 ऑगस्टला औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे