राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावल्यानंतरही राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यानं राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक दि चेन अंतर्गत’ राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंधांची घोषणा केली होती.

आता हे कडक निर्बंध 15 मेपर्यंतपुढे वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतले आहेत. त्यामुळं आता राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. या संदर्भात शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा