गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग : अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अमानुषपणे बलात्कार

PUBLISHED BY NILESH PATIL

झूम मराठी टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कारण, एका 23 वर्षीय नराधम तरुणाने अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अमानुषपणे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घराबाहेर खेळत असणार्‍या चिमुरडीचा हात धरुन याने तिला गोडीगोडीने त्याच्या घरात नेवून हे अमानविय कृत्य केले. ही घटना शुक्रवार दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशन रमेश ददेल (वय 23, रा. इंदिरानगर, ता. संगमनेर, जि. अ.नगर) असे या नराधमाचे नाव आहे. रोशन ददेल हा संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. तो संगमनेरमधील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या इंदिरानगर परिसरात राहायला असून त्याचे काही दिवसांपासून वागणे ठिक वाटत नव्हते.त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जेव्हा एक चिमुकली घराबाहेर खेळण्यासाठी आली होती. तेव्हा ती अन्य मुलांप्रमाणे खेळत-खेळत आरोपी ददेल याच्या घरासमोर गेली. तिला पाहुण या नराधमाची नियत फिरली आणि हा देखील तिच्यासोबत खेळण्यासाठी गेला.

चिमुकलीच्या मनात जरा देखील कल्पना नव्हती की, हा रक्षक आहे की भक्षक. त्याच वेळी याच्यातील राक्षस जागा झाला आणि त्याने हिला त्याच्या खोलीत नेले. दरम्यान, मैदानात खेळत असलेलं लेकरु या नराधमाने बंद खोलीत नेताच त्याने त्याचे अश्लिल चाळे सुरू केले. अवघ्या चार वर्षाची मुलगी तिला अत्याचार काय करणार? मात्र, तरी देखील या तरुणाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री जेव्हा पीडित बालिकेला त्रास होऊ लागला तेव्हा तिने आईला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळी तो त्रास वाढता झाल्याने तिला रुग्णालयात दाखविण्यात आले.

त्यानंतर डॉक्टरांनी काही गोष्ठी विचारल्या असता या घटनेवर प्रकाश पडला. ही घटना घडताच पालकांनी संताप व्यक्त केला आणि आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, या घटनेची वार्ता ही संगमनेरात अगदी वार्‍यासारखी पसरली. सोशल मीडियावर घटनेता निषेध सुरू झाला.

त्यामुळे, आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली होती. पीडित मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी रोशन ददेल याला अटक केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे