आरोग्य व शिक्षणमराठवाडामहाराष्ट्र

डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या ‘इवान’ कवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार 

डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या ‘इवान’ कवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

साप्ताहिक ‘झेप’ च्या वतीने साहित्य,वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे अत्यंत प्रतिष्ठेचे “मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार” नुकतेच जाहीर करण्यात आले.

प्रा.डॉ. विद्याधर बन्सोड हे सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी कथा,कादंबरी, पथनाट्य, ललित,समीक्षा, वैचारिक असे विपुल लेखन केलेले आहे.त्याशिवाय गोंडवाना विद्यापीठ कला शाखा अभ्यासक्रमासाठी पुस्तकांचे संपादन, साहित्य संमेलन तसेच साहित्यविषयक अनेक पुस्तकांच्या संपादनात त्यांनी योगदान दिलेले आहे.त्यांना अनेक राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

औरंगाबाद येथील निर्भिड व उत्तुंग विचारांचे मराठी साहित्यिकांचे विचारपीठ साप्ताहिक ‘झेप’ च्या वतीने साहित्य,वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे अत्यंत प्रतिष्ठेचे “मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार” नुकतेच जाहीर करण्यात आले.

सदर पुरस्काराचे वितरण डिसेंबर मध्ये औरंगाबाद येथे होणाऱ्या झेप साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा झेप कोअर कमिटीने केलेली आहे.

वरील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सूर्यांश साहित्य मंच,डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन,सरदार पटेल महाविद्यालयातील सहकारी तसेच महाराष्ट्रातील साहित्य रसिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

ZOOM Advertising

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे