जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात
- पाचोरा | झूम मराठी ऑनलाईन
76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये राष्ट्रध्वज फडकावून संस्थेच्या संचालिका सौ प्रितीजी जीवनजी जैन यांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी शाळेतील शिक्षक व विध्यार्थी तसेच कर्मचारीनीं उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडियम स्कूल शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी संस्थेच्या संचालिका सौ प्रितीजी जीवनजी जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी झेंडा गीत देशभक्तीपर भाषणे तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदररित्या सादरीकरण केले, या कार्यक्रमा मध्ये तीन मुख्य आकर्षण म्हणजे वर्ग ५ वीच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचे दुष्परिणाम आणि पालकांची जबाबदारी ही छोटी नाटीका, वर्ग ९वी व ७वीच्या विद्यार्थ्यांनी मुलगा व मुलगी यांच्यात भेदाभेद नको या विषयावर पथनाटय व वर्ग 6वीच्या विद्यार्थ्यानी भारतीय संस्कृतीवर आधारीत नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकलीत या कार्यक्रमाच्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री जीवनजी जैन, सहसचिव श्री संजयजी बडोला, खजिनदार श्री जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवाणी तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता पाटील मॅडम, सीईओ श्री अतुल चित्ते सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ रुपाली जाधव मॅडम व सौ निर्मला पाटील मॅडम यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण बोरसे सर तथा आभारप्रदर्शन सौ . स्मिता देशमुख मॅडम यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



