आपल खान्देशमहाराष्ट्र

धुळे शहर ठरले राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ! सलग २८ दिवस एकही कोरोना रुग्ण …

झूम मराठी न्यूज मीडिया टीम, 7 ऑगस्ट 2021     धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.

धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत शहरात कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत . त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने आहेत. त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.धुळे शहरात २५ जुलै रोजी शेवटचा कोरोना रुग्ण आढळला होता. नंतर ३ ऑगस्टपासून एकही नवीन रुग्ण नाही. गेल्या दोन महिन्यांत कोणत्याही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. यापूर्वी ८ जून रोजी ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. कोरोनाने मृत्यू झालेला शहरातील तो शेवटचा रुग्ण होता. ३१ डिसेंबर २०२० रोजी शहरात सर्वाधिक १११ रुग्ण बाधित होते. यानंतर ही संख्या कमी झाली.

५ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरातील बाधितांची संख्या ५३ होऊन हा आकडा वाढत होता. २५ जुलै रोजी ही संख्या शेवटच्या एका रुग्णावर येऊन थांबली. नियमांची अंमलबजावणी, लसीकरण व प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न यामुळेच धुळे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे.

एखाद्या शहर-गावात सलग २८ दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही किंवा कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार, हे शहर किवा गाव कोरोनामुक्त ठरते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे