माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत ढाब्यांवर महापालिकेची कारवाई
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणेदि २७ नोव्हेंबर : दि २६ नोव्हेंबर : महानगरपालिका हद्दीतील माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत विनापरवाना असलेले अनधिकृत ढाबे निष्कासित करण्याची कारवाई अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली. ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये सुरू आहे. या कारवाईअंतर्गत विश्वनाथ विलेज धाबा- कोलशेत खाडीकिनारी, जयमल्हार ढाबा- कोलशेत तरीचा पाडा, राकेश ढाबा- विमल पुर्णेकर कंपाऊंड कोलशेत, गझल ढाबा- बाळकुम पाडा नं. 1 पाईपलाईनजवळ, शुभ चायनीज मालक-हनुमानमंदिर, बाळकुम नाका या ढाब्यावर कारवाई करुन ढाबे निष्कसित करण्यात आले.अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई
माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
महापालिकेची पदपथावरील अतिक्रमणावरील कारवाई
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा