महाराष्ट्र

श्रीकृष्ण मंदिर नववा वर्धापन दिन मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा


पुणे (प्रतिनिधी उमेश पाटील )श्रीकृष्ण मंदिर कासारसाई येथे मंदिराचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी देवास मंगल स्नान भगवतगीतेचे पठण करण्यात आले. पि के इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक ह भ प श्रीमान जगन्नाथ काटे यांचे हस्ते करण्यात आले नंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले सभेच्या अध्यक्षस्थानी प म श्री पुजदेकर बाबा घोटी नाशिक हे होते. मुख्य प्रवचन व्याख्यान मार्तंड प म श्री बाभुळगावकर बाबा यांचे झाले प्रवचनातून त्यांनी भक्ती आणि प्रेम यावर उद्बोधन केले भगवतगीता लीळाचरित्र ज्ञानेश्वरी अभंग गाथा हे ग्रंथ समाजासाठी कीती महान आहे याचे प्रतीपादन केले या प्रसंगी समाजीक कार्य करण्यासाठी तत्पर असलेले प्रतिष्ठीत सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

  • श्री बाळासाहेब शितोळे यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला
  • श्री नानासाहेब विनोदे वाकड यांना जिवन गौरव पुरस्कार देण्यात आला
  • श्री मानिक डावरे यांना धर्म भुषण पुरस्कार देण्यात आला
  • श्री केदु बनाजी लाडे यांना धर्म भुषण पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प म श्री संतोषमुनी शास्त्री कपाटे औरंगाबाद यांनी केले दिप प्रज्वलन प म श्री कृष्णराज बाबा शास्त्री शिक्रपुर यांनी केले या प्रसंगी पुजनिय श्री वाल्हेराज बाबा अंकुळनेरकर माळवाडी ,पुजनिय श्री संतराज बाबा शहाबाद हरीयाना,पुजनिय श्री बायराज बाबा पुजनिय दिवाकर बाबा जातेगाव सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रवादी चे श्रीमान सागरभाऊ साखरे हिंजवडी, श्री आनंदभाऊलाटे युवराज कलाटे सागर शितोळे बापु केमसे बाळासाहेब बावकर मधुकर बावकर असे अनेक धार्मिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार या संस्थेच संस्थापक संचालक पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ मुकुंदराज बाबा कपाटे यांनी आभार मानले या प्रसंगी श्री हनुमंत दशरथ बावकर यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना अन्नदान केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे