पाचोरा येथील जारगाव चौफुली अतिक्रमणाच्या विळख्यात!!
कार्यकारी संपादक – निलेश पाटील
पाचोरा :- पाचोरा तालुका येथील जारगाव चौफुली म्हणजे अत्यंत संवेदनशील असून रोड हायवे होण्याच्या 3 ते 4 वर्षापुर्वी एक दोन दिवसात एक्सीडेंट व्हायचे! तीन वर्षांपूर्वी मोठा एक्सीडेंट झाल्यामुळे सगळे अतिक्रमण काढले!होते त्यानंतर हायवे झाला! पण हायवेच्या बाजूला अनेक लहान-मोठ्या टपरीधारकांनी काही दिवसातच अतिक्रमणाचा वेढा सुरु केला असून परत एक्सीडेंट होण्याची दाट शक्यता वाढली आहे तसेच जारगाव चौफुलीजवळ जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेच्या प्रवेश गेटजवळ अतिक्रमण करण्यात आले आहे! अतिक्रमण जागेवर आरसीसी कॉलम ओतले गेले आहे सदर काम थांबवण्यासाठी जारगाव येथील ग्रामसेवक आर पी पाटील यांनी अतिक्रमण धारकाला नोटीस बजावली असून त्या नोटिशीला अतिक्रमण धारकाने कचऱ्याची टोपली समजली! पुढील कार्यवाही पाचोरा पंचायत समितीचे बी डी ओ साहेब काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर असेच प्रकार चालू राहिले तर भविष्यात खूप मोठे संकटाला तोड द्यावे लागेल!विनाकारण वाहनाना अडथळा तयार होतो!काल्या- पिल्या अवैध वाहातूक आणि त्यात परत अतिक्रमण जारगाव ग्रामपंचायतीने टपरी धारक ठेलेवाले यांची पर्यायी व्यवस्था लवकर करावी!आज भरपूर ठिकाणी जारगाव ग्रामपंचायतीचा ओपन स्पेस आहे!



