आपल खान्देश

पाचोऱ्यात अपंग महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले

 एका 31 वर्षीय अपंग महिलेने घराच्या छतावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली असून पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील कृष्णापूरी भागातील रहिवाशी असलेल्या ३१ वर्षीय अपंग महिलेने राहत्या घराच्या छताला दोर बांधून गळफास घेऊन आमहत्या केली. ही घटना आज सकाळी आठ वाजता घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्तेचे खरे कारण समजू शकले नाही.

कृष्णापूरी भागातील अंबिका किरणा स्टोअर्सचे संचालक रमेश चव्हाण यांची पत्नी अर्चना रमेश चव्हाण हिने आज सकाळी आठ वाजता पती किराणा दुकानात असतांना घराच्या मागच्या खोलीत गळफास घेऊन आमहत्या केली. पती पत्नी रमेश व अर्चना हे दोघे अपंग असून किराणा दुकान चालवत सुखाने संसार करीत होते. आत्महत्तेच्या आदल्या दिवशी सकाळी रमेशच्या आईची वर्षी साजरी केल्यानंतर दुपारी किरणा दुकानात सत्यानारायणाची पूजा करण्यात आली.

त्यानंतर अर्चना हिने रात्री नऊ वाजेपर्यंत गल्लीतील रहिवाशांना सत्यनारायणाचा प्रसाद वाटप केला. घरात कुणाहीशी वाद नसतांना अर्चनाने आत्महत्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अर्चना हिस दोन लहान मुले आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेमुळे कृष्णापूरी परीसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे