आपल खान्देश

पाचोरा तहसीलदारांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने पदोउन्नतीचे आरक्षण निवेदन

(RMBKS) राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या पाचोरा शाखा याच्यांवतीने पदोउन्नतीचे आरक्षण बचाओ दुसरे चरणातील निवेदन पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले 

पाचोरा | राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ पाचोरा शाखेच्या वतीने पदोन्नतीचे आरक्षण बचाओ संविधान बचाओ दुसरे चरणातील निवेदन पाचोरा तहसीलदार मा. कैलास चावडे यांना देण्यात आले!तसेच त्याच्यांसोबत चर्चा करून

 विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, आणि 7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला या शासन निर्णयानुसार एस सी, एसटी,व्ही जे एन टी, एसबीसी च्या पदोन्नतीतील 33% आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणून संघटनेच्यावतीने एस सी, एसटी, व्ही जे एन टी, एस. बी. सी. च्या पदोन्नतीतील 33% आरक्षणची मागणी करण्यात आली तसेच ओबीसीला देखील पदोन्नतीत आरक्षण देण्याची, मराठा आरक्षण लागू करण्याची, नोकर भरती करण्याची मागणी करण्यात आली. जरनेल सिंग विरुद्ध एल एल गुप्ता ह्या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील पदोन्नतीतील आरक्षण हे मूलभूत अधिकारात असून सरकार पदोन्नतीत आरक्षण देऊ शकत असा 2018 मध्ये निर्णय दिलेला आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय आपोआप व्यपगत होतो, तरी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आ. उद्धव ठाकरे साहेब यांनी शिवराय, फुले, शाहू ,आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचार।ला बांधील राहून 7 मे 2021चा शासन निर्णय त्वरित रद्द करून बहुजन कर्मचार्यांना न्याय द्यावा. याप्रसंगी आर एम बी के एस संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील तसेच तालुका प्रतिनिधी रत्नाकर सोनवणे, एस डी भिवसने, सचिन पाटील, ए यु आंधळे साहेब, एम एन न्युज चे निलेश पाटील, व्ही एस भिवसने, संदीप उदावंत, महेश घारगिल,ऍड. करुणाकर ब्राह्मणे इंडियन लॉयर असोसिएशन, भारत मुक्ती मोर्चा चे प्रसिद्धीप्रमुख, मा नंदलाल आगारे, उत्तर महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मोर्चा चे उपाध्यक्ष संतोष पवार, RPI चे विनोद अहिरे साहेब उपस्थित होते. आजच्या या मागणीला, म रा अत्यंत पिछडा वर्ग राज्य उपाध्यक्ष मा दीपक आदिवाल, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष मा. हमीद श।ह तसेच इंडियन लॅ।यर असोसिएशन चे तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट अनिल पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भास्कर दाभाडे पाटील, BMP चे तालुकाध्यक्ष मा सुनीलदादा शिंदे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा रणजित तडवी यांनीदेखील पाठिंबा दिला आहे.तसेच

पत्रकार दिव्य मराठीचे विनायक दिवटे, झुम मराठी न्यूज संपादक  दिलीप जय परदेशी, एम एन न्यूज निलेश पाटील उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे