आपल खान्देश
बकरी ईद निमित्त पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्या दालनात मीटिंग
पाचोरा | बकरी ईद निमित्त पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्या दालनात मीटिंग घेण्यात आली संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद उत्सव साध्या पध्दतीने साजरी करा व सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरीच अदा करावे असे सूचना करण्यात आली.

करोनाच्या डेल्टा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद उत्सव साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सामूदायिक नमाज पठणाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मुस्लिम बांधवांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करीत घरीच नमाज पठन करावे, असे पाचोरा पो.स्टे. येथे मिटिंग मध्ये योग्य सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेला उपस्थित पोलीस स्टॉफ सुनील पाटील, राहुल बेहरे, किशोर पाटील नितीन पाटील शेख जावेद पत्रकार उपस्थित होते.



