देश-विदेशमहाराष्ट्रराजकीय
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे ४ शिलेदार ! राणे ,भागवत कऱ्हाड ,कपील पाटील ,भारती पवार
नवी दिल्ली। नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकार २ चा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असून विशेष बाब म्हणजे हयात महाराष्ट्रातील ४ नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. ज्यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील,भारती पवार, आणि भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (७जुलै) संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. तर महाराष्ट्रातील मोदी कॅबिनेटमध्ये ४ नेत्यांची वर्णी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत जलद आणि महत्वपूर्ण घडामोडी घडत असल्याचं देखिल पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाकडे देशाचे लक्ष आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला.




