क्रिडा व मनोरंजनदेश-विदेश

अलिसीया मोंटानो’ ह्या महिलेने इतिहास घडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

अलिसीया मोंटानो’ ह्या महिलेने इतिहास घडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

साडेआठ महिने’ प्रेग्नन्ट असलेल्या या अमेरिकन धावपटूने 800मी ची शर्यत 2 मिनिटे आणि 32.13 सेकंदात पूर्ण केली. पाच वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली अलीसिया ह्या शर्यतीत तिच्या वैयक्तिक सर्वोच्च (मोनॅको) रेकॉर्ड पेक्षा फक्त 35 सेकंद हळू धावली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, “प्रेग्नन्ट असताना मी पहिल्या महिन्यापासून धावण्याचा सराव करते आहे. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम फार महत्वाचा असतो. मला धावताना मजा वाटते. फिटनेस वाटतो. त्यामुळे चौतीस आठवडे प्रेग्नन्ट असूनही मला विशेष त्रास झाला नाही. ह्याही वेळी मजाच आली.”

स्पर्धेत ती बाकीच्या स्पर्धकांच्या मागे पडली नाही. पहिल्या लॅपपासूनच ती वेगाने धावत होती. तिने पहिला लॅप पूर्ण केल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्या पडू लागल्या आणि तिने शर्यत पूर्ण करेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. 

हे सर्व अलीसियाने अगदी विचारपूर्वक केलं. ती माध्यमांना सांगते, “मला आधी काळजी वाटत होती. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले की मी ही स्पर्धा धावू शकेल. डॉक्टरांनी मला थांबवलं नाही, उलट स्पर्धेत धावायला प्रोत्साहन दिलं. तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि मी स्पर्धेत धावायचा निर्णय घेतला. धावताना सर्वकाही नॉर्मलच होतं. अगदी नेहमीसारखं. फक्त मी प्रेग्नन्ट होते.”

अलीसियाने स्त्रियांना कसलीच मर्यादा नसते हे दाखवून दिलं. तिच्या आत्मविश्वासातून नवीन पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे