आपल खान्देशमहाराष्ट्र

सावधान सिंगल यूज प्लास्टिक वापरा बाबत धडक मोहीम सुरू…


झूम मराठी वृत्त

देशात 1 जुलै पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार असल्याचे केंद्राने निर्देश जारी करण्यात होते आणि त्यानुसार 1 जुलै पासून ही बंदी लागू करण्यात आली आहे.

संपूर्ण भारतामध्ये सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पाचोरा नगरपरिषदेने सिंगल युज प्लास्टिक बाबत धडक मोहीम सुरू केलेली आहे. शहरातील सर्व दुकानदार, व्यापारी, नागरिक यांना सूचित करण्यात येते की, कोणीही प्लास्टिक चा वापर करू नये, असे आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही पाचोरा नगरपरिषद मार्फत करण्यात येईल. यापुढेही ही मोहीम अशीच सुरु राहील. नागरिकांनी देखील प्लास्टिक चा वापर बंद करायचा आहे. अन्यथा त्यांच्यावर देखील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे पाचोरा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी यांनी झूम मराठीशी बोलताना सांगितले.

सिंगल यूज प्लास्टिकवर का बंदी घातली गेली? जे प्लास्टिक आपण एकदाच वापरतो आणि वापरल्यानंतर फेकून देतो त्यांना सिंगल यूज प्लास्टिक म्हटले जाते. पण असे केल्याने याचा विपरीत परीणाम पर्यावरणावर होतो. आणि निसर्ग चक्र बिघडतं. यामुळे सरकाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे.सिंगल यूज प्लास्टिक वापरल्यास होणार कठोर कारवाईजर १ जुलैनंतर कोणी Single Use Plastic चा वापर करत असाल त त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितलं. असे केल्यास तुरुंगवास आणि दंड आकारला जाऊ शकतो. पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम 15 अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या वस्तूंची यादी जाहीर केली असून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या या वस्तू आहे.प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या), प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिक चमचे, प्लास्टिक चाकू, स्ट्रॉ, ट्रे, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, सिगरेटचं पॅकेट, 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी) कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद आणि इन्विटेशन कार्ड इत्यादी


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे