आपल खान्देश

कुर्‍हाड भागात रानडुक्कर च्या हल्ल्यात एक जखमी :शासनाच्या मदतीची कॉग्रेस केली मागणी

कुर्‍हाड भागात रानडुक्कर च्या हल्ल्यात एक जखमी :शासनाच्या मदतीची कॉग्रेस केली मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुर्‍हाड भागात रानडुक्कर च्या हल्ल्यात सालदार जखमी झाला. हिंस्र प्राण्यांपासून वनविभागाने शेतकऱ्यांना तात्काळ उपाय योजना ची कॉंग्रेस ने मागणी केली आहे

पाचोरा तालुक्यातील मालखेडा फॉरेस्ट मध्ये जवळपास ३२७ हेक्टर चे जंगल असुन या भागातील शेतकऱ्यांना हिंस्र प्राण्यांपासून खुप मोठे नुकसान सहन करुन शेतकरी आणि शेतमजूर यांच्यावर नेहमी हिंस्र प्राण्यांचे नेहमी हल्ले होत असतात आज शिवसेना शेतकरीसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांच्या शेतातील सालदार जब्बार तडवी यांच्यावर आज रानडुक्कर ने हल्ला करुन त्यास जखमी केले. जखमीवर पाचोर्यात हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जखमीला भेटुन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तालुक्यातील या जंगलाच्या लगत असलेल्या जवळपास ५०० हुन अधिक शेतकर्‍यांचे नुकसान नेहमी होत असते वनविभागाने आणि शासनाने याकडे लक्ष देवून कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे