आपल खान्देश
परदेशी धनगर समाज पंच मंडळ, कुसुंबा ची कार्यकारिणी जाहीर!
कुसुंबा (प्रतिनिधी) कुसुंबा येथील परदेशी धनगर समाज पंच मंडळ कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी छबिलाल तुळशीराम परदेशी तर उपाध्यक्षपदी नारायण हारसिंग परदेशी आणि सचिव म्हणून दिपक शिवराम परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.

कुसुंबा येथील धनगर समाज भवनात समाज बांधवांची बैठक कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आली. निंबा पांडू परदेशी यांनी राजीनामा दिल्याने व काही इतर सदस्यांचे दु:खद निधन झाल्याने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित सर्व समाजबांधवांची मते जाणून घेण्यात आली. पंच होण्यासाठी इच्छूक व्यक्तींची नावे घेण्यात आली. त्यानंतर सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी पंच मंडळाची पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली.अध्यक्ष- छबिलाल तुळशीराम परदेशी, उपाध्यक्ष- नारायण हारसिंग परदेशी, सचिव- दिपक शिवराम परदेशी तसेच सदस्य प्रा. डॉ. दत्ता परदेशी, जिजाबाई धोंडू परदेशी, रतन आनंदा परदेशी, बाबुलाल पुंडलिक परदेशी, प्रदिप पुंडलिक परदेशी, सुरेंद्र विठ्ठल परदेशी, दिलीप गरबड परदेशी, दत्तात्रय नथ्थू परदेशी, प्रकाश मुरलीधर परदेशी, जगदिश फत्तेसिंग सूर्यवंशी.
सदर पंच कमिटीला मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळात निंबा पांडू परदेशी, महादू झगा परदेशी, रामलाल तुळशीराम परदेशी, मोतीलाल धनजी परदेशी, निंबा महादू धनगर यांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीसाठी माजी सरपंच गेंदा नागो परदेशी, लुकडू महादू परदेशी यांचेसह समाजबांधव उपस्थित होते.
समाजातील कालबाह्य़ रूढी बंद करणे, समाजभवनाचा विस्तार करणे, गुणवंतांना प्रोत्साहन देणे यासारखी समाजाची कामे पूर्णवेळ करून समाजाच्या उत्कर्षासाठी झटणार असल्याची प्रतिक्रीया अध्यक्ष छबिलाल परदेशी यांनी दिली.




