सदर भुयारी मार्ग संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी गांभीर्य ओळखत भुयारी मार्ग सुरू करावे
पाचोरा (वार्ताहर): पाचोरा येथुन जवळ असलेल्या भातखंडे खुर्द येथील नागरीकांचे अतोनात हाल होत आहे.पाचोरा हे बाजारपेठेचे ठिकाण असुन खेड्यापाड्यातुन नागरीक बाजार अत्यंत आवश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी येत असतात.मात्र वडगाव टेक रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे.सदर भुयारी मार्ग सुरू नसल्याने नागरीकांचे हाल होत आहे.भुयारी मार्ग तात्काळ सुरू करावे असी मागणी भातखंडे खुर्द ग्रामपंचायत सरपंच दिनेश जगतराव पाटील सदस्यांकडून होत आहे.
सदर भुयारी मार्ग संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी गांभीर्य ओळखत भुयारी मार्ग सुरू करावे. पाचोरा येथे ये-जा करण्याकरीता पर्यायी मार्ग म्हणुन रेल्वे पुलाखालुन वापरतात मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्याचे पाणी साचल्यामुळे नागरीकांचे हाल होत आहे.सदर भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू करावे.व नागरीकांची समस्या सोडण्यात यावी.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा