आपल खान्देश
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाचे धुळ्यात चक्काजाम आंदोलन; आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका!!
Dilip J Pardeshi @ ZoOm Marathi News
धुळे : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत रद्द झालेले आरक्षण तात्काळ मिळवून द्यावे, या मागणीसाठी भाजपचे नेते खा डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यात नगाव येथे हायवेवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

भाजपचे महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन राबविण्यात आले त्याच पद्धतीने धुळे जिल्हात नगाव येथे हायवेवर चक्का जाम आंदोलन धुळे तालुका भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली याप्रसंगी खा डॉ सुभाष भामरे, श्री सुभाष दादा देवरे, माजी जि प सदस्य रामदादा भदाणे, प्रा अरविंद जाधव,बापू खलाने,आशुतोष पाटील,उपसभापती विद्याधर पाटील, भाऊसाहेब देसले, किशोर संघवी, देवेंद्र पाटील, किशोर हलोर, संग्राम पाटील, रितेश परदेशी, रामदास पाटील, यांच्यासह तालुक्यातील जि प. सदस्य, पं स सदस्य, सरपंच, उपसरपंच व भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




