महाराष्ट्र

मतदान करण्यासाठी एक तास सवलत मिळण्याबाबत शिक्षण मंत्र्यांकडे विनंती. 


सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. केडिट सोसायटी लि. मुंबई ही संस्था महाराष्ट्र राज्यातील अनुदानित शाळा, कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांची पगारदार सहकारी पतसंस्था आहे.  संस्थेच्या महाराष्ट्र राज्यात एकूण २२ शाखा असून संस्थेने एकूण ३१४७९ सभासद आहेत.  संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२१ ते २०२६ या कालावधीसाठीची निवडणूक दि.१८/१२/२०२१ रोजी होवू घातलेली असून दि.१८/१२/२०२१ रोजी मतदान होणार आहे.  संस्थेच्या सभासदांना सविंधानानुसार त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना १ तासाची सवलत देण्यात यावी ही  विनंती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे केली गेली आहे.

सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील यांनी या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांना पत्र दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे