आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

खबरदार, ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनास रस्ता दिला नाही तर; राज्यात नवा नियम लागू!

राज्यातील सर्व टोलनाक्यांना हे निर्देश लागू आहेत. महामार्गावरून ही वाहने जातील तेव्हा टोलनाक्यांवर त्यांना थांबविण्यात येऊ नये. यात टँकर किंवा सिलिंडर वाहून नेत असलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे.

झूम मराठी न्यूज वेब मीडिया

आजघडीला कोरोनाचा संसर्ग अनेक ठिकाणी वाढत असून, ऑक्सिजनची कमतरताही भासत आहे. परिणामी विविध वाहनांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेला जात आहे. मात्र ऑक्सिजन वाहून नेताना त्या वाहनास टोलनाक्यांसह कुठेही अडविण्यात येऊ नये. त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशा आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व टोलनाक्यांना हे निर्देश लागू आहेत. महामार्गावरून ही वाहने जातील तेव्हा टोलनाक्यांवर त्यांना थांबविण्यात येऊ नये. यात टँकर किंवा सिलिंडर वाहून नेत असलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे. या सगळ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा आहे. त्यांना वेगाने सोडावे. कोणत्याही प्लाझावरून याबाबतचे वाहन विनाअडथळा पास व्हावे; असे निर्देश देण्यात आले आहेत. जिथे ऑक्सिजन घेऊन जात आहे, त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी दिली. या वाहनांना अॅम्बुलन्ससारखा रस्ता द्यावा लागणार आहे.

राज्याच्या सीमेवरही हे निर्देश लागू मोठे टँकर हे २० टन किंवा पंधरा टनाचे असतात. त्यांना अनेक वेळ महामार्गावर थांबविले जाते. मात्र रुग्णवाहिकेला ज्याप्रमाणे थांबविले जात नाही त्याप्रमाणे या वाहनांही थांबवू नये. तातडीने ऑक्सिजन वाहून नेता यावा म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या सीमेवरही हे निर्देश लागू होतील. कारण राज्याबाहेरून देखील ऑक्सिजन मागविला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे