महाराष्ट्रराजकीय
जळगाव महापालिकेत भाजपला पुन्हा खिंडार ?
मुंबई | जळगाव महापालिकेत भाजपमध्ये उभी फूट पाडून सत्ता काबीज करणार्या शिवसेनेने आज पुन्हा एकदा भाजपला हादरा दिला असून आज तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला

याबाबत वृत्त असे की, तीन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आज महापालिकेतील तीन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर आज शिवसेनेत प्रवेशाची तयारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर आज दुपारी काही नगरसेवक वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्रीच्या उपस्थित शिवासेनेत केला प्रवेश!




