आपल खान्देश
अंबरनाथ शिधावाटप कार्यालयाची दुरावस्था
अंबरनाथ शिधावाटप कार्यालयाची दुरावस्था झाली असून शिधावाटप कार्यालयालगतच असलेल्या कल्याण – बदलापूर रस्त्यांचे रुंदीकरण व कॉक्रीटीकरण करण्यात आल्याने याठिकाणी उंचवटा तयार झाला असून पावसाळ्यात याठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचून नागरिकांना व येथील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागेल याची दखल घेत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी जिल्हाप्रमुख श्री.गोपाळजी लांडगे साहेब यांच्यासह ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत अंबरनाथ पंचायत समितीच्या आवारातील मोकळ्या खोलीत सुरू करण्यात यावे अशी लेखी मागणी. यावर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी, उपशहरप्रमुख श्री. गणेश कोतेकर, माजी नगरसेवक श्री. सुभाष साळुंके, शिधावाटप फ परिमंडळ उपनियंत्रक श्री. वंजारी आदी उपस्थित होते.



