आपल खान्देश

रेल्वेखाली सापडून पाचोऱ्यातील 55 वर्षीय इसम ठार!!

पाचोरा (प्रतिनिधी) धावत्या रेल्वेखाली सापडून पाचोऱ्यातील 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असुन घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी शेख शब्बीर (चाळीसगाव) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे हे करत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेल्वे लाईन खंबा कि. मी. नं. ३७१ / ९ / ८ नजीक डाऊन लाईनवर एका मालगाडी खाली सापडुन मंगळवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती पी. सी. पी. के. (मालगाडी) लोको पायलट यांनी पाचोरा स्टेशन मास्तर यांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आढळून आले. ए. टी. एम. च्या आधारे बँकेत चौकशी केली असता मयताचे नाव सुभाष संपतराव नागणे असल्याचे निष्पन्न झाले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने अति रक्तश्रावामुळे त्यांचा जागेवर मृत्यू झाला. मृतदेह हा पोलीस नाईक दिनेश पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेची माहिती कळवून मृतदेह त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे