ब्रेकिंग

पाचोऱ्यातील एक अद्वितीय कलाकाराची यशोगाथा..

दहावीत 91.62 टक्के गुणांसह कस्तुरी चित्ते शाळेत प्रथम

पाचोरा | आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कस्तुरी रजनीकांत चित्ते हिने 91.62 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कस्तुरीच्या यशामागे तिची अथक मेहनत, जिद्द, कुटुंबाचे भक्कम सहकार्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. सिद्धांत जगताप सर आणि स्वप्निल जाधव सर यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे कस्तुरीने सांगितले.

अभ्यासाबरोबरच कस्तुरीला चित्रकलेची विशेष आवड असून, या क्षेत्रातही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर तिने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. तिच्या चित्रांचे विविध प्रदर्शनांमध्ये कौतुक झाले असून, कला क्षेत्रात ती सातत्याने प्रगती करत आहे. विशेष म्हणजे, चित्रकलेसंदर्भात तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील असून, त्याद्वारे ती आपल्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवत आहे.

कस्तुरी ही पाचोरा येथील उद्योजक रजनीकांत अशोक चित्ते तसेच “कस्तुरी ब्युटी पार्लर”च्या संचालिका सौ. अंजना रजनीकांत चित्ते यांची कन्या आहे. शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील तिच्या उल्लेखनीय यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे