आपल खान्देश
खडकदेवळा परीसरातून बैल आणि गाय चोरीस गेली!
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु|| येथील राजाराम दगा देवरे खडकदेवळा बु| यांच्या वाडयातील बैल व गाय अज्ञात चोरट्यांनी रात्री 3 ते 4 वाजेच्या सुमरास चोरी केली आहे...
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकरी राजाराम दगा देवरे खडकदेवळा बु| यांच्या वाडयातील बैल व गाय अज्ञात चोरट्यांनी रात्री 3 ते 4 वाजेच्या सुमरास चोरट्यांनी चोरी केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. काही महिन्यांत परिसरात बैल चोरीची ही तिसरी घटना आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, बैल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी राजाराम दगा देवरे यांनी आपल्या मुलांप्रमाणे या जनवराना प्रेम दिले होते. असे झूम मराठीशी बोलताना ते हळहळत होते. या परिसरात सर्वच शेतकरी पाळीव जनावरे वाड्यात किंवा शेतातच ठेवतात. या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव जनावरे चोरांची टोळी या परिसरात कार्यरत झाल्याचे दिसते, बैल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे





