आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पालकांसाठी आनंदाची बातमी आमदार किशोर आप्पा पाटिल यांच्या संकल्पनेतुन नर्मदा इंटरनॅशनल स्कूलचा शुभारंभ..  

पाचोरा (दिलीप परदेशी) पाचोरा आणि भडगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात, किशोर पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पाचोरा येथे ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’ या सीबीएसई (प्रस्तावित) शाळेचा दिमाखदार शुभारंभ होत आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून एका भव्य ‘ज्ञानोत्सव नॉलेज फेस्टिव्हल २०२६’ उद्या २२ मार्च २०२६ (रविवार) वेळ: सायंकाळी ५:०० वाजता स्थळ: १८८- अंतुर्ली फाट्याजवळ, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव. येथे रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण आणि ज्ञानाचा जागर केला जाणार आहे.

या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे आपले विचार मांडतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय पाटील (मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे. आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या परिवाराने सर्व नागरिकांना या ज्ञानोत्सवात आपल्या सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. पाचोरा-भडगावच्या शैक्षणिक प्रगतीचा हा नवा अध्याय पाहण्यासाठी आपण सर्वांनी नक्की यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे