आपल खान्देश
धुळ्यात पोलीस मुख्यालयातून सात फूट नागाची सुटका..!

धुळे पोलीस मुख्यालय परिसरातून ७ फुटी नागाचे रेस्क्यूधुळे – शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास मोठा नाग आढळून आल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत नरेश शिरसाठ यांनी तात्काळ सर्पमित्र आयान शेख यांना फोन करून माहिती दिली.
माहिती मिळताच सर्पमित्र आयान शेख, इरफान शेख, वेदांत बहाळकर , दुर्गेश जाधव, हर्षल फुलपागारे व बबलू वाकरे हे घटनास्थळी त्वरित पोहोचले. परिसरात सुमारे १० ते १५ मिनिटे शोध घेतल्यानंतर तेथे तब्बल साडेसहा ते सात फूट लांबीचा भलामोठा नाग आढळून आला.
सर्पमित्रांनी अत्यंत सावधगिरी बाळगत नागाला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर कोणालाही इजा न होता त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या धाडसी कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांचे कौतुक केले.



