आपल खान्देश

पाचोरा नगरपरिषद नवनिर्वाचित शिक्षण सभापती प्रविण ब्राह्मणे यांचा सकल धनगर समाज बांधवांकडुन सत्कार.


पाचोरा-भडगांव मतदारसंघाचे आमदार आप्पासाहेब कीशोर पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा आणि भडगांव नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवक मोठ्या संख्येत विजयी झाले.

या निवडणुकीत पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधुन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रवीण भाऊ ब्राम्हणे आणि त्यांच्या पत्नी सौ.वर्षा ताई ब्राम्हणे हे पती पत्नी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पाचोरा नगरपरिषद विषय समीती निवडणुकीत कार्यसम्राट हॅट्रिक आमदार आप्पासाहेब कीशोर पाटील यांनी प्रवीण ब्राम्हणे यांच्याकडे शिक्षण सभापतीपदाची जबाबदारी दिल्याने पाचोरा तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांकडुन नवनिर्वाचित शिक्षण सभापतीचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कीशोर पेंढारकर, संजय परदेशी, विलास पाटील, विशाल हटकर, सुनिल निळे, विनोद तावडे, गोशाळेचे  पाटील, चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे