राष्ट्रीय भूगोल दिन आणि त्याच दिवशी भुगोलच्या सरांनी घेतला अखेरचा श्रास..!

- दिलीप परदेशी | खांन्देश टुडे
धुळे | 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिन आणि त्याच दिवशी भुगोल विषयाचे अध्यापन करणारे माजी शिक्षक व्ही बी सूर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याने भूगोल विषयाच्या अभ्यासकामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
धुळे जिल्ह्यातील कुसूंबा येथील मोतीराम कडू शिंदे महाविद्यालयाच्या जुनिअर कॉलजला भूगोल विषयाचे माजी प्रा. व्ही.बी. सूर्यवंशी सर नेहमी लक्षात राहतात. ज्या काळात भूगोल विषयांचे संसाधने, ऑनलाइन ॲप्स व वेबसाइट्स उपलब्ध नसताना आपल्या खास शैलीत भूगोलाचे अध्यापन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. भूगोलाचे अनमोल मार्गदर्शन साध्या स्वरूपात शिकवले जात होते.
भूगोल शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय, मात्र तेवढाच उत्साहवर्धक विषय हाताळणारे भूगोल विषय शिकवणारे सूर्यवंशी यांनी अनेक विध्यार्थी घडवले. भूगोल मानवी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रोजच्या जीवनातील अनेक बाबी या भूगोलाशी संबंधित असतात नेहमी शिकवतांना ते सांगत असे, शालेय अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो. त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होत असे मात्र विध्यार्थ्यांना प्रा. सूर्यवंशी सर भूगोल शिकवतांना किती साध्या स्वरूपात शिकवत होते हे त्यांच्या विद्यार्थ्यांना आठवल्या शिवाय राहणार नाही. भूगोलावर आधारित विविध प्रश्न आणि उत्तरे आठवड्यातून एका दिवशी नेहमी घेत असत, भूगोल हा विषय नकाशांच्या आणि सोप्या ट्रिकच्या माध्यमातून शिकवून सोपा करणारे प्रा. व्ही बी सूर्यवंशी सर 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिवशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसून आले.



