आपल खान्देश

अक्कलपाडा धरणाच्या जॅकवेल सह फिल्टर प्लांटची खासदारासह, सभापती, मनपा अधिकारी यांनी केली पाहणी..

झूम मराठी वृत्तसेवा

धुळे (झूम मराठी) बहुचर्चित व बहुप्रतीक्षेत असणाऱ्या अक्कलपाडा येथील जॅकवेलची व फिल्टर प्लांटची आज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह मनपा सभापती व अधिकाऱ्यांनी कामकाजाची पाहणी करुन माहिती घेतली आहे. तसेच जॅकवेलचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होणार असून धुळेकरांना ग्रॅव्हिटी फोर्सने रोज पाणी दिले जाणार असल्याचे आश्वासन खासदार भामरे यांनी धुळेकरांना दिले आहे. तसेच या निमित्ताने फिल्टर प्लांटची देखील पाहणी करण्यात आली.

170 कोटी रुपयांची ही योजना असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही योजना मंजूर करण्यात आली होती. जो पर्यंत पाण्याची पातळी कमी होत नाही तो पर्यंत जॅकवेलचे काम करता येत नाही. आता पाण्याची पातळी कमी होऊन जॅकवेलच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच दिवाळीपर्यंत सदर प्रकल्प पूर्ण होणार असून धुळेकर यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुभाष भामरे यांनी केले आहे. 

उन्हाळ्यात धुळेकर यांची झालेली पाण्यासाठी फरफट, पाण्याची बिघडलेली नियोजन त्यामुळे धुळेकर जनता त्रस्त झाली होती. त्याच अनुषंगाने धुळेकर यांची पाण्याची समस्या कायमची निकाली निघाली यासाठी जॅकवेलचे काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले आहे. 

याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, सभापती शितल नवले, माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक सुनील बैसाणे, अभियंता चंद्रकांत उगले, एन के बागुल, राकेश कुले वार, यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे