दि पाचोरा लायर्स असोसिएशनच्या वतीने सावित्रीमाईंना अभिवादन..

- दिलीप परदेशी
पाचोरा येथील दी पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या वकिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने अभिवादन करून फुले दांपात्याचे समाजाबद्दलचे योगदान आणि स्मृती जाग्या करण्यात आल्या.
सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणच नाही तर विधवा पुनर्विवाह, बालविवाह बंदी, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या विषयांवरही ठाम भूमिका घेतली.आजच्या काळात स्त्रिया शिक्षण, विज्ञान, प्रशासन, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, यामागे सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आणि त्यांचे विचार आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य आणि विचार आत्मसात करून समतामूलक, शिक्षित समाज घडवण्याचा संकल्प करण्याची हीच खरी आदरांजली आहे असे माहिती देतांना सांगण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ वकील सदस्य ॲड. बापू सैंदाणे, ॲड. एस बी माहेश्वरी ॲड.एम .बी. मराठा, ॲड.अनुराग काटकर ॲड .अनिल पाटील ॲड .अंकुश कटारे , ॲड .रवी ब्राह्मणे ॲड.स्वप्नील पाटील , हे उपस्थित होते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व त्यानंतर मनोगत ॲड.सुनील सोनवणे ॲड .पी .डी. पाटील , ॲड गोपाल पाटील ॲड . प्रशांत मालखेडे यांनी मनोगत व्यक्त केले व सावित्रीबाई फुले यांचे समाजाबद्दलचे योगदान थोडक्यात समजाविले
यावेळी दि पाचोरा लॉयर्स असोसिशनचे उपाध्यक्ष ॲड. रविंद्र ब्राम्हणे, ॲड .ज्ञानेश्वर लोहार, ॲड. बबलू पठाण ,ॲड .सुनील सोनवणे, ॲड.कैलास सोनवणे हे पदाधिकारी आणि ॲड .तुषार नैनाव, ॲड. राजेंद्र वासवानी, ॲड. गोपाल पाटील ॲड. निलेश जाधव ॲड. रवींद्र राजपूत ॲड .व्यास, ॲड .प्रशांत मालखेडे, ॲड.निलेश पाटील, ॲड. निलेश पाटील, ॲड.सागर सावळे, ॲड.प्रदीप सूर्यवंशी , ॲड .एल. एस .परदेशी, ॲड. ईश्वर जाधव, ॲड .अविनाश सुतार, ॲड .जयराज उबाळे, ॲड.पी डी पाटील, ॲड.नरेंद्र डाकुरकर, राजेंद्र पाटील, ॲड .प्रियंका न्याती (पाटील) माजी सरकारी वकील अनिल पाटील ॲड.ललित सुतार. सरकारी वकील श्री नाईकवाडे कार्यालयीन कर्मचारी तायडे, सोनवणे, व संदीप पाटील ,संदीप जगताप यास असंख्य वकील व कर्मचारी पक्षकार उपस्थित होते बांधव उपस्थित होते. आभार सुनील सोनवणे यांनी व्यक्त केले.




