आपल खान्देश

Pachora ShivMahapuran शिवमहापुराण कथेत झाला “शिव-पार्वती” यांच्या नयन रम्य असा विवाह सोहळा..


पाचोरा येथील पातळेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती, ग्रीन एप्पल इव्हेंट व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने मोहन अग्रवाल, मुन्ना अग्रवाल ,संदीप महाजन यांनी 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान आयोजित केलेल्या शिव महापुराण कथा व महा रुद्राभिषेक सोहळ्यास शहर व परिसरातील भाविकांचा अभुतपूर्व प्रतिसाद लाभत असून मंगळवार दिनांक 2 मे रोजी सायंकाळी कथे दरम्यान पार पडलेला शिव पार्वती यांचा देखणा विवाह सोहळा पाहून उपस्थित भाविक कमालीचे भारावले.

भडगाव रोड भागातील कैलादेवी मंदिरा मागे असलेल्या सावा यांच्या जागेत 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान शिवमहापुराण कथा व महा रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भगवान शिवप्रभू नगरी उभारण्यात आली आहे. 

‘एक लोटा जल, सारी समस्याओंका हल’ या घोषवाक्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय कथा वाचक परम पुज्य पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांचे कृपाछत्र प्राप्त शिष्य परम पुज्य पंडित संजयजी शर्मा यांच्या अमृतवाणीतून शिवपुराण कथेचे निरूपण होत आहे .कथेसोबतच महारुद्राभिषेकाचे हि आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 7.30ते 9.30 दरम्यान महारुद्राभिषेक व सायंकाळी 5.30 ते 9.30 दरम्यान शिवपुराण कथा होत असून कथा निरूपणानंतर नैनिताल येथील सोनुजी बक्षी व सहकाऱ्यांचा झाकीचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर क़ेला जात आहे. शिव महापुराण कथे दरम्यान दररोज विविध जिवंत देखावे तसेच धार्मिक विधी होत असल्याने भाविक कमालीचे आकर्षित झाले आहेत. कथेनंतर मोफत प्रसाद वाटपासाठी अनेकांचे दातृत्व लाभत आहे. कथा ऐकण्यासाठी,आरती , अभिषेक व प्रसादा साठी भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत असल्याने आयोजकांची सुयोग्य नियोजनासाठी दमछाक होत आहे. 

या कथे दरम्यान महारुद्राभिषेका साठी वैयक्तिक व कौटुंबिक तसेच 1 ते 7 दिवसाच्या अभिषेकास भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. महारुद्राभिषेकात सहभागी होणाऱ्यांना पंडित संजयजी शर्मा यांच्या हस्ते शिवलिंग, नंदी ,नागदेवता, त्रिशूल ,जनाधारीपात्र, जलाधारी स्टॅन्ड व दोन रुद्राक्ष भेट देण्यात येत आहेत. या शिव महापुराण कथेसाठी आमदार किशोर आप्पा पाटील ,रमेश मोर, राधेश्याम अग्रवाल, मुकुंद अण्णा बिल्दीकर, पुनमचंद शेठ मोर, राम शेठ केसवानी, सुनील मोर, प्रभुदयाल शर्मा ,संदीप महाजन सर, ओम शांती ग्रुप, गोराडखेड्याचे रामू दादा, दाजीबा हॉटेलचे मालक सुनील मराठे,प्रा बी डी बोरकर, श्री राधा मंडळ, श्री जगदंब टेक्सटाईल, अग्रवाल एन एक्स, ङॉ सागर गरुड, डॉ मुकुंद सावनेरकर, जगदीश पटवारी यांचे मोठे आर्थिक योगदान लाभले असून शहरातील तृतीयपंथी, जागेचे मालक सुभाष सावा, रवींद्र पाटील, ब्राह्मण समाज महिला मंडळ, रुग्णवाहिका चालक संजय पाटील, ट्रेन लाईव्हचे दिलीप पाटील, यांचे सहकार्य लाभले आहे. विविध जाती-धर्माचे दानशूर, गोरगरीब, मध्यमवर्गीयांकडूनही मदतीचे हात पुढे येत आहेत. विविध समाजाच्या महिलांनी यात आपल्या हातून सेवा कार्य व्हावे म्हणून समाजातील महिलां पुरूषांचे सहकार्य लाभत आहे. मंगळवारी सायंकाळी कथे दरम्यान विधिवत पार पडलेला शिव पार्वती यांचा देखणा व नयनरम्य असा विवाह सोहळा पाहून भाविक कमालीचे भारवले. विवाह सोहळ्यानंतर कन्यादानासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत केली. शिव पार्वती विवाह सोहळ्याप्रसंगी तृतीय पंथीयां सह महिला, पुरुष भाविकांनी केलेले नृत्य लक्षवेधी ठरले. कथा निरूपणानंतर अभिषेक व आरतीचे यजमान यांचा पंडित संजयजी शर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे. शिवपुराण कथा स्थळी शिव रक्षा कवच व रुद्राक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कथा समाप्ती नंतर होणाऱ्या महाकाल आरतीसाठीही भाविक गर्दी करत आहेत. 

मोहन अग्रवाल, मुन्ना अग्रवाल, ग्रीन ॲपल इव्हेंटचे संदीप महाजन आदींच्या नियोजनानुसार शिव महापुराण कथेस भाविकांचा व दानशुरांचा कमालीचा प्रतिसाद लाभत असून कथास्थळी महिला व पुरुषांसाठी बसण्याची, पाण्याची व प्रसाद वाटपाची स्वतंत्र व उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आल्याने भाविक आनंदले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे