आपल खान्देश

भडगाव तालुक्यातील जि.प. गुढे वडजी गटाचा आश्वासक चेहरा, जननायक भैय्यासाहेब पाटील…

  • दिलीप परदेशी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव तालुक्यात गावागावत शिक्षणाची गंगा नेणारे शिवसेना पक्षाचा जि.प. गुढे वडजी गटाचा आश्वासक चेहरा म्हणजेच भैय्यासाहेब पुंडलिक पाटील हे खरे धुरंधर मानले जात आहेत.

भडगांव तालुक्यातील धुरंधर नेतृत्व, दूरदृष्टी असणारा नेता, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख जळगाव, चेअरमन शेतकरी सहकारी संघ भडगाव, कै. बापुसो. पुं. का. पाटील शिक्षण संस्था गुढे संचलित चेअरमन व भडगाव गुढे वडजी गटाचा आश्वासक चेहरा  जनसेवक भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांचा आज वाढदिवस..

अनुकूल परिस्थितीवर मात देत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यात गावागावात शिक्षणाची गंगा नेऊन गोर गरीब विध्यार्थीनां चांगले शिक्षण देण्यासाठी सदैव प्रयत्न त्यांनी केला. भडगावात वैद्यकीय औषधीसाठी सुसज्ज श्री साई समर्थ फार्मसी कॉलेज, भडगाव तालुक्यातील गुढे येथील कै. बापूसो पु. का. पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून  गांव तेथे शाळा हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील गावागावात शिक्षणरुपी बीज पेरून आज वटवृक्ष बहरून आलाय. आज पाचोरा-भडगाव मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांचे विश्वासू चेहरा म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आज भैय्यासाहेब पुंडलिक पाटील हे शिवसेना पक्षाचा जि.प. गुढे वडजी गटाचा दावेदार म्हणून त्यांच्या कडे पहिले जाते.

भैय्यासाहेब पाटील हे कै. बापूसाहेब पु. का. पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच भडगाव तालुका शेतकरी संघाचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, शेती आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्याची मजबूत छाप असून, ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांच्या मनात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुढे-वडजी परिसरात त्यांच्या कार्यामुळे निर्माण झालेली सकारात्मक प्रतिमा आणि सातत्याने घेतलेला लोकसंपर्क यामुळे त्यांच्या नावाभोवती मोठी चर्चा रंगू लागली आहे. कार्यकर्त्यांच्या मते, “भैय्यासाहेब फिक्स!” असा नारा गावोगाव दिला जात असून, स्थानिक पातळीवर त्यांचा जनाधार वेगाने वाढत आहे.

भैय्यासाहेब पाटील यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामीण विकास, शिक्षणाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या सामाजिक कुटुंबीय परंपरेचा वारसा आणि सार्वजनिक कार्याची नाळ गावोगाव जोडलेली असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाचोरा भडगावचे स्थानिक आमदार किशोर पाटील यांचे ते निकटवर्तीय समर्थक मानले जातात. त्यामुळे यावेळी गुढे-वडजी गटात आमदारांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून भैय्यासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत मजबूत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, भैय्यासाहेब पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यास गुढे-वडजी गटात निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. आज त्यांचा वाढदिवस मोठया उत्साहात तालुक्यात साजरा होत आहे. त्यानां पुढील वाटचालीस शुभेच्छा..

@दिलीप परदेशी

 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे