आखतवाडे ते नगरदेवळा रस्ता घेणार मोकळा श्वास.
सदर रस्ता दुरुस्त होत असल्याने आखतवाडेसह परिसरातील वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे
पाचोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नगरदेवळा जाण्यासाठीचा आखतवाडेसह परिसरातील वाहन चालकांना सोईचा एकमेव असलेला आखतवाडे ते नगरदेवळा रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. आखतवाडेसह परिसरातील वाहन धारकांना पाचोरा-भडगांव आणि चाळीसगाव या तालुक्यांच्या ठीकाणी जाण्यासाठी अत्यंत कमी अंतराचा मार्ग आहे.
आखतवाडेसह परिसरातील बदरखे, दिघी, नागद, नेरी, वडगाव, भडाळी, भामरे यागावांतील ग्रामंस्थांसह वाहन धारकांना सोईस्कर असलेल्या आखतवाडे ते नगरदेवळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत, त्यामुळे वाहन चालकांना सदर रस्त्यावरून वाहनचालक चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आखतवाडेसह परिसरातील ग्रामंस्थांनी जळगाव. जि.प.चे नगरदेवळा-बाळद गटाचे मा.सदस्य रावसाहेब जिभाऊ पाटील यांच्यासह तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुरावाने सदर रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याने कामास सुरुवात झाली आहे, सदर रस्ता दुरुस्त होत असल्याने आखतवाडेसह परिसरातील वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


