आपल खान्देश

पाचोऱ्यात गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता कमिटीचे बैठक संपन्न

पाचोऱ्यात गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सदर बैठकीस नगराध्यक्ष, नायब तहसीलदार, वीज कर्मचारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य उपस्थित होते

पाचोरा (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रातील आनंदाचा सण म्हणजे गणेश उत्सव, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवा वर ही याचा परिणाम झाला आहे. येणारे गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आज रोजी पाचोरा पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता बैठक आयोजित केली होती.

आज दि. 5/9/2021 रोजी पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य व गणेश मडंळाचे पदाधिकारी यांची मा. उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा भाग श्री भारत काकडे यांचा अध्यक्षतेखाली बैठक घेतली. सदर बैठकीस नगराध्यक्ष, नायब तहसीलदार, वीज कर्मचारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य असे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन येणारा गणपती उत्सव आगमन ते विसर्जन वेळी मिरवणुक काढु नये बाबत तसेच कोरोना अनुशगांने महाराष्ट्र शासनाकडील प्राप्त सूचना समजून सांगितले आहेत व सार्वजनीक गणेश मुर्ती 4 फुट व घरगुती गणेश मुर्ती 2 फुट पेक्षा मोठी नसावी तसेच परवानगी फार्म भरू सोबत हमीपत्र जोडणे बाबत सांगीतले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे