लांब पाल्याच्या रेल्वे आसनगाव येथे थांबा पाहिजे
योगेश परदेशी मागणी आसनगाव स्टेशन वर एक्सप्रेस गाड्या थांबा साठी लेखी निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी वासिंद ता.शहापुर- दि. १९ मार्च शुक्रवार रोजी भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष मा. श्री. दादासाो. रविंद्र चंदे साहेब यांना आसनगाव स्टेशन वर एक्सप्रेस गाड्या थांबा साठी लेखी निवेदन देण्यात आले
यावेळी भाजपा चे माजी पदाधिकारी जावेदजी अक्तर ( समाज सेवक वासिंद), श्री. योगेश परदेशी( सह संघटक- भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण), राष्ट्रिय अंधत्व निवारण असोसियशन चे सदस्य *श्री. डॉ. सुरेश धनगर* ( नेत्र चिकित्सा आधिकारी ग्रामीण रुग्णालय मुरबाड), *श्री प्रविण(दादा) दौलत परदेशी* (समाज सेवक), *श्री. विनोद कुमार शर्मा* (वासिंद), *श्री. गोपाल (भाई) पाठक* ( वासिंद), *श्री.दिपक हरणे* ( सिव्हिल इंजिनियर), कु. कल्पेश गढरी (वासिंद) श्री. विकास गोलांगे सर (माध्यमिक शिक्षक कळवा), शेखर सोनी(वासिंद) डॉ. लोकेश धनगर (शहापुर), आबुशाम पटेल(वासिंद) *मोहम्मज जीशान* (वासिंद) , साहेब आलम( वासिंद)आदि उपस्थित होते.
श्री. दादासो रविंद्र चंदे साहेब यांनी निवेदनाचा स्विकार केला, आणि लवकरच कार्यसम्राट खासदार मा.श्री. कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने या कार्यास मार्गी लावु असे आश्वासित केले.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण संघटना दिल्ली यांंचे सदस्यत्व मिळाल्या बद्दल डॉ.श्री. सुरेश धनगर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष श्री. रविंद्र चंदे साहेब यांनी सत्कार केला.


