राजकीय

देशातील प्रसिद्ध तिरुपती देवस्थान ट्रस्टवर शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

देशातील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत अशा तिरुपती देवस्थानाच्या नव्या ट्रस्ट बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे या ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट बोर्डात स्थान मिळाले आहे.

आंध्र सरकारने सलग दुसऱ्यांदा वय.व्ही.रेड्डी यांची या देवस्थानी ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हि नियुक्ती त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री ठरवत असतात. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना नियुक्तीसाठी नावे सुचवत असतात. देशातील सर्वात प्रतिष्ठित म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून मिलिंद नार्वेकर यांचे नाव सुचवलेअसल्याची माहिती मिळाली आहे. आंध्र सरकारकडून २८ सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. उद्धव ठाकरे यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे