आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

Pachora | अत्याचारानंतर १४ वर्षीय तरुणी गर्भवती, पाचोरा शहरातील धक्कादायक प्रकार..


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया 

पाचोरा शहरातील एक १४ वर्षीय तरुणी अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी सातही संशयित आरोपींना अटक केली आहे.

पिडित तरूणी २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघून गेली होती. यानंतर तिच्या आजीने २८ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली. २९ एप्रिल रोजी भडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये पिडीता जेवण करतांना आढळून आली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी पिडीतेची चौकशी करून तिची जळगाव बालकल्याण समीतीकडे रवानगी केली. दरम्यान, बाल कल्याण समितीने पिडीत तरुणीची प्राथमिक वैद्यकिय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पाचोरा पोलिसांना कळताच जळगाव येथे जात तरुणीची सखोल चौकशी केली असता तिने सर्व आपबिती सांगितली. 

त्यानुसार सुमित कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरूणांनी वेळोवेळी वेगवेगळी आमिष दाखवून शारिरिक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. पिडीतेने सातही तरूणांना ओळखले आहेत. सातही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे. पिडीतेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचा संशयित आरोपींनी फायदा घेत पिडीतेवर प्रत्येक संशयित आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कुणी पिडीतेला खाऊ, तर कुणी नवीन कपडे घेऊन देण्याचे आमिष दाखवीत अत्याचार केला. तर दुसरीकडे काही व्यक्तींनी पिडीतेला मदत केल्याचे देखील तपासात समोर आले आहे. पाचोरा पोलीस आता पिडीतेची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करणार असून त्यानंतर पिडीत नेमकी किती महिन्यांची गर्भवती आहे, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे