ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

मनसेने पहिली यादी, केली जाहीर

विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता होती, ती आता खरी ठरली असून अमित ठाकरेंना माहिम मतदारसंघातून उतरवण्यात आलं आहे. पहिल्या यादीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. सोमवारी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर चर्चा केली. कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? मनसे उमेदवार ती जागा जिंकू शकतात का? याचा आढवा घेतला होता. तसेच अमित ठाकरे यांनी माहीम मतदरसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीत धरला. दरम्यान, यापूर्वीच राज ठाकरेंनी 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता, 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. त्यामध्येही अविनाश जाधव यांचं नाव जाहीर आहे.


मनसेकडून कुणाकुणाला उमेदवारी जाहीर?

कल्याण ग्रामीणमधूम राजू पाटील, माहीममधून अमित ठाकरे, भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव, मुरबाड मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संगिता चेंदवणकर यांची बदलापूर अत्याचार प्रकरणात लावून धरण्यात निर्णायक भूमिका ठरली होती.

पुण्यात कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसर येथून साईनाथ बाबार, खडकवासलातून मयुरेश वांजळे, मागाठाणे येथून नयन कदम, बोरीवलीत कुणाल माईणकर, दहिसर मतदारसंघातून राजेश येरुणकर, दिंडोशीतून भास्कर परब, वर्सोवा मतदारसंघातून संदेश देसाई, कांदिवली पूर्वेतून महेश फरकासे, गोरेगाव येथून विरेंद्र जाधव, चारकोप दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्वेतून भालचंद्र अंबुरे, विक्रोळीत विश्नजित ढोलम, घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्वेतून संदीप कुलथे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे