चला फॉर्म भरायला, पाचोऱ्यात येत्या २४ ऑक्टोबर रोजी मोठं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार
येत्या २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान प्रत्येक पक्षांचे सांभाव्य उमेदवार तयारी लागले असून
पाचोरा भडगाव विधानसभा शिवसेनेचे उमदेवार म्हणून किशोरआप्पा पाटील व दिलीपभाऊ वाघ हे दोघे दिग्गज उमदेवार एक मे एकांसमोर उभे ठाकलेले असून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज एकाच दिवशी दाखल करणार असल्याने या निमित्ताने पाचोऱ्यात येत्या २४ ऑक्टोबर गुरुवारी रोजी मोठं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
शिवसेनेचे किशोरआप्पा पाटील हे पाचोराशहरातील तुळजाई जिनींग मोंढाळा रोड येथून सकाळी 11: 00 वाजता जनसभा घेऊन शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरायला निघतील तर दिलीपभाऊ वाघ हे पाचोराशहरातील राजे छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी 10 : 00 वाजता शक्तीप्रदर्शन करत आपल्या कार्यकर्ते समवेत उमेदवारी भरणार आहेत.
पाचोरा भडगावची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अमोल शिंदे, दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी आणि सचिन सोमवंशी यांचे आव्हाण असणार आहे, या निवडणुकीत जनता कोणाला कौल देते हे महत्वाचे ठरणार आहे.



