आपल खान्देशब्रेकिंग

कुसूंबा ग्रामपंचायत हद्दीत ह्या रस्त्यांची केली स्वखर्चाने साफ सफाई

कुसूंबा | धुळे तालुक्यातील कुसूंबा गावाच्या श्री स्वामी समर्थ नगर परिसरात रस्त्यावरील  काटेरी झाडे वाढल्याने नागरिकांची कित्येक महिन्यांपासून येण्या जाण्यासाठी चांगलाच त्रास सहन करावा लागत होता.

कुसूंबा ग्रामपंचायत हद्दीत श्री स्वामी समर्थ नगर परिसरातील रस्त्यावर काटेरी झूडपांनी केलेल्या अतिक्रमणमुळे रस्त्यात झाडे कि झाडात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रस्ता दुर्लक्षित झाला होता कुसूंबा गावातील  सामाजिक कार्यकर्ते ओबीसी समाजाचे नेते म्हणून ओळख असलेले अँड योगेश परदेशी यांनी स्वखर्चातून  श्री स्वामी समर्थ नगरच्या रहिवाशी यांच्या विनंती वरून वैद्यनाथ शिवमंदिर परिसर , काॅलनीतील गल्ली, शिव बाबा केंद्र जवळील रस्ता  परिसरात रस्तावर  काटेरी झाडे झुडपे जेसिबीच्या सहाय्याने काढले असता परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

नागरिकांच्या सेवेत  तातडीने काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा करण्यात आल्याने सदर रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याने त्यांच्या ह्या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले. अँड योगेश परदेशी हे नेहमी समाज उपयोगी कार्यात अग्रेसर असतात.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे