आपल खान्देश
धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध रांगोळी काढत आंदोलन केले
मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देत ‘आत्तापर्यंत ३७ राज्य सरकारला आणखी पाहिजे तरी किती’ या घोषवाक्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी आज धुळे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये संपादरम्यान घोषणाबाजी करीत राज्य सरकारला संतप्त प्रश्न विचारला आहे.
धुळे : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. राज्यातील प्रत्येक आगारात विविध आंदोलन केले जात असून धुळ्यात देखील निषेध रांगोळी काढून आंदोलन केले. यात आत्तापर्यंत ३७.. राज्य सरकारला आणखी पाहिजे तरी किती” अस घोषवाक्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध रांगोळी काढत आंदोलन केले

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या मागणीसाठी आतापर्यंत जवळपास ३७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. या मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देत ‘आत्तापर्यंत ३७ राज्य सरकारला आणखी पाहिजे तरी किती’ या घोषवाक्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी आज धुळे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये संपादरम्यान घोषणाबाजी करीत राज्य सरकारला संतप्त प्रश्न विचारला आहे.
फास लावलेला दोरखंड व त्याखाली राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे या मागणीच्या आशयाची रांगोळी काढून राज्य शासनातर्फे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याचा देखील निषेध यावेळी एसटी कर्मचारी आंदोलकांनी केला आहे.




