लॉकडाउनच्या आडून शिवसेना व भाजपमधील संघर्षाची अखेर ! कडक लॉकडाउन रद्द!
शिवसेनेचे वामन म्हात्रे यांची सरशी!
अवेळी मुरबाड पॅटर्नचा बदलापूरमध्ये अंमलबजावणी करून,आमदार किसन कथोरे यांनी मुख्यधिकारी दीपक पुजारी यांना हाताशी धरून शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना पर्यायाने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला व पालिकेच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता.त्याला उघडपणे वामन म्हात्रे यांनी विरोध करून, लॉकडाउन होऊ देणार नाही असे जाहीर केले. परंतु तरीसुद्धा त्यानंतर जिल्हाधिकारी व आमदार यांनी घोषित केल्याप्रमाणे लॉकडाऊन कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आणि रुग्णसंख्या अडीचशेवरुन शंभर आले असताना,तसेच आधीच सर्व व्यापारी, मजूर व सामान्य माणूस अडचणीत असताना, कोणालाही विश्वासात न घेता हा लॉकडाउनचा दहा हजार-पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या गावाचा मुरबाड पॅटर्न चार लोकसंख्या असलेल्या शहरात योग्य होणार नाही हे पटवून दिले. त्यानुसार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना मुरबाड पॅटर्न मागे घेण्याचे आदेश दिले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा