आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील मोहलाई गावात पहिल्यांदाच पोहोचली बस, यूवक आबालवृद्धांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला.

  • झूम मराठी न्यूज

” ती ” गावात आली..तब्बल 75 वर्षानंतर! तिच्या येण्याने गावात आनंदाचे उधाण आले. तिला बघण्यासाठी गाव जमला. हारतूऱ्यांनी तिचे स्वागत केले.

  • संजय परदेशी.

स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटले. मात्र, पाचोरा तालुक्यातील मोहलाई गावात लालपरी पोहचली नव्हती. बाजारासाठी गावकऱ्यांना तब्बल सहा किमी लांब असलेला नगरदेवळा गाठावे लागत असे. ग्रामपंचायतेने गावात बस फेरी सूरू करण्याची मागणी लावून धरली. मागणीला यश मिळालं अन् पहिल्यांदाच लालपरी गावात आली. लालपरीचा स्वागतासाठी गाव एकवटला.  यावेळी युवा कार्यकर्ते हर्षवर्धन रावसाहेब पाटील यांच्याहस्ते बसच्या वाहक चालकाचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. मोहळाई, ता. सोयगांवचे सरपंच संदीप राठोड, माजी सरपंच राजेंद्र दुधे, आखतवाड्याचे माजी सरपंच संजय परदेशीं, शुभम धनगर, पोलीस पाटील यांनी बसचालक ज्योतीराम महाजन, वाहक पंकज पाटील स्वागत केले.

जळगाव जिल्हा आणि संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या मोहलाई हे गांव अर्धे गांव जळगाव जिल्ह्यात तर बाकीचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात येते ग्रामपंचायत कारभार हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील मोहलाई गावात चालतो, या गावात बस सेवा नसल्याने येथील ग्रामस्थ, रुग्ण, बाजारासाठी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी नगरदेवळा येथे ये-जा करतात. बस सेवा सुरू झाल्याचा फायदा दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना झाला आहे.

या भागात बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी होती. त्या साठी शुभम धनगर यांनी पाठपुरावा केला आणि त्याला यश मिळाले असून,  आता बससेवा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. आता ही बस नगरदेवळा येथुन सकाळी 11:00 वाजता आणि सायंकाळी 5:00 वाजता विद्यार्थी आणि प्रवासी घेऊन मोहळाई पर्यंत जाऊन परत येणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे