स्वखर्चातून मोहलाई ते निपाणे रस्त्याची डागडुजी; मोहलाईतील सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार.
- झूम मराठी न्यूज नेटवर्क
मोहलाई निपाणे रस्त्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून अक्षरशः दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर पडलेले खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. तसेच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
मोहलाई गावातील काही सामाजिक कार्यकर्ते पुढे आले व माजी सरपंच राजेंद्र दुधे यांनी स्वखर्चातून हे खड्डे बुजवण्याचा व प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मोहलाई गावाचे माजी सरपंच राजेंद्र दुधे यांनी मोहलाई निपाणे रस्त्यावरील खड्डे जेसीबी व ट्रॅक्टरचा साह्याने खड्डे बुजले त्यांच्या सोबत दयाराम ओंकार गढरी, शुभम धनगर, बाप्पू कोळी, दादाभाऊ दुधे, पितांबर माळी, कडू राठोड, करण अर्जुन, हिरालाल पवार, नामदेव आनंद पाटील याचे सहकार्य लाभले.
या सामाजिक कामा मुळे येणारे वाहन चालकांनी, व गावातील नागरिकांनी या कामाचे कौतुक केले, मोहलाईचे माजी सरपंच राजेंद्र दुधे हे नेहमी समाज उपयोगी कार्यात अग्रेसर असतात.



